OMG 2 Trailer: 'शुरु करो स्वागत की तैयारी...' ; अक्षयच्या ‘ओमएजी 2’ चा ट्रेलर रिलीज
ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
OMG 2 Trailer: अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे कांती शरण मुद्गल या भूमिकेत दिसत आहेत. कांती शरण मुद्गलच्या कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतात. या अडचणींचा सामना ते कसे करतात? यामध्ये अक्षय कुमार हा त्यांची मदत कशी करतो? हे सर्व ओएमजी- 2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज ओएमजी- 2 हा चित्रपट पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.
ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'नंदी मेरे भक्त पर विपदा आने वाली है मेरे शिवगण में से किसी ऐसे को ले जाओ जो उसकी रक्षा कर सके' असा डायलॉग ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये कोर्टरूम सीन दिसतो. ज्यामध्ये दिसते की, कोर्टात कांती शरण मुद्गल यांचे नाव घेतले जाते. आरोपी आणि तक्रारदार कोण? असा सवाल न्यायाधीश विचारतात. त्यानंतर दोन्ही प्रश्नांची उत्तरं देताना पंकज त्रिपाठी हात वर उचलतात.
ट्रेलरमध्ये दिसते की, पंकज म्हणजेच कांती शरण मुद्गल देवाची भक्ती करताना दिसत आहेत. त्यांचे कुटुंब भगवान शंकराची भक्ती करत असते. अचानक त्यांच्या मुलासोबत एक घटना घडते. ज्यामुळे कांती शरण मुद्गल यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत अडकते. ट्रेलरमध्ये अभिनेत्री यामी गौतम ही वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे.
पाहा ट्रेलर:
View this post on Instagram
अभिनेता अक्षय कुमारनं सोशल मीडियावर ओएमजी- 2 या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, 'शुरू करो स्वागत की तैयारी… 11 अगस्त को आ रहे हैं डमरूधारी' अक्षय कुमारनं शेअर केलेल्या ओएमजी- 2 या चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ओएमजी- 2 या चित्रपटाला सेन्सॉरने 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ओएमजी-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ओह माय गॉड 2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
OMG 2 Teaser Out: "रख विश्वास, तू है शिव का दास"; ओएमजी-2 चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस