एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऋषी कपूर यांचा बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात संताप
मुंबई : खलनायक, अभिनेता, संन्यासी आणि राजकारणी असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या विनोद खन्नांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्नांच्या पार्थिवावर मुंबईतल्या वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शक्ती कपूर, सरोज खान, अब्बास मस्तान यांच्यासह राजकीय वर्तुळातील मंडळींनीही विनोद खन्नांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेतलं.
विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारानंतर ऋषी कपूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारण विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडच्या आजच्या पिढीतील एकाही अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची उपस्थिती नव्हती.
''नव्या पिढीचा एकही अभिनेता किंवा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता.
हे लाजीरवाणं आहे. काहींनी तर त्यांच्यासोबत कामही केलं आहे.
दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे.
माझ्यावेळेसही कुणी खांदा देण्यास येणार नाही,
अशी मी स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी.
स्वतःला स्टार म्हणवून घेणाऱ्यांचा आज खूप राग आला आहे.
काल रात्री प्रियंका चोप्राच्या पार्टीमध्ये कितीतरी 'चमचा' लोकांना भेटलो,
इथे मात्र त्यातले काहीच जणं होते...''
असे ट्वीट ऋषी कपूर यांनी केले.
दरम्यान रणबीर कपूर देशाबाहेर असल्याने उपस्थित राहू शकला नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये दिलं. संबंधित बातम्या :विनोद खन्नांच्या 'त्या' निर्णयाने बॉलिवूड हादरलं होतं!
'अमर'ला 'अकबर'ची श्रद्धांजली, ऋषी कपूरनी प्रोफाईल फोटो बदलला!
विनोद खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement