Nitin Desai Suicide: सुधीर मुनगंटीवार ते सुप्रिया सुळे; राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली
काही राजकीय नेत्यांनी नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या निधनानंतर ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
![Nitin Desai Suicide: सुधीर मुनगंटीवार ते सुप्रिया सुळे; राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली Nitin Desai passed away Political leaders paid tribute to Nitin Desai Nitin Desai Suicide: सुधीर मुनगंटीवार ते सुप्रिया सुळे; राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/4d729600f68663c7ccd35a7df3f444901690957607163259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांचे आयुष्य संपवलं आहे. नितीन यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
भाजप नेते विनोद तावडे यांनी नितीन देसाई यांचा एक फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिलं, 'जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा!'
जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! pic.twitter.com/XPglciNmQC
— Vinod Tawde (@TawdeVinod) August 2, 2023
तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील ट्वीट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,'प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.'
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व दुःखद आहे. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/8ioVoBxYV6
— Supriya Sule (@supriya_sule) August 2, 2023
नितीन देसाई यांच्या निधनानंतर सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्वीट शेअर करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी "एक्झिट" संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे.'
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी "एक्झिट" संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. #NitinDesai pic.twitter.com/maQFDsNq7w
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 2, 2023
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आयुष्यातून घेतलेली अकाली एक्झिट धक्कादायक आहे. बिग बॅनर्स हिंदी चित्रपटातून लार्जर दॅन लाइफ पडद्यावर दाखविण्यासाठी भव्यदिव्य सेट्स उभारणाऱ्या नितीनजींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनाही या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो. ॐ शांती'
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आयुष्यातून घेतलेली अकाली एक्झिट धक्कादायक आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 2, 2023
बिग बॅनर्स हिंदी चित्रपटातून लार्जर दॅन लाइफ पडद्यावर दाखविण्यासाठी भव्यदिव्य सेट्स उभारणाऱ्या नितीनजींच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे.
त्यांच्या आत्म्यास… pic.twitter.com/VA9ysP2eVH
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)