एक्स्प्लोर
रवी शास्त्रींसोबत अफेअरची चर्चा, अभिनेत्री निमरत कौर म्हणते...
अभिनेत्री निमरत कौर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना डेट करत असल्याची चर्चा आहे. या बातम्यांवर निमरतने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : एअरलिफ्ट सिनेमातील अभिनेती निमरत कौर आपल्यापेक्षा वयाने 20 वर्षांनी मोठे असलेल्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर निमरत कौरने स्पष्टीकरण देत या सर्व तथ्यहीन गोष्टी असल्याचं म्हटलं आहे.
निमरत कौरने एक ट्वीट केलं आहे, ज्यातून ती स्पष्टीकरण देत आहे. मात्र तिने स्पष्टपणे यात काहीही म्हटलेलं नाही. सत्यपरिस्थिती ही आहे, की मला रुट कॅनल करायचंय. बाकी तुम्ही ज्या बातम्या वाचत आहात, त्या तथ्यहीन आहेत. या तथ्यहीन गोष्टी तुम्हाला अनेकदा त्रास देतात, असं तिने म्हटलं आहे.
निमरत कौरच्या ट्वीटवरुन हे स्पष्ट होतं, की ती अफेअरच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देत आहे. रवी शास्त्री आणि निमरत कौर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त सोमवारी सकाळी समोर आलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. रवी शास्त्री आणि निमरत कौर एक-दोन महिन्यांपासून नाही, तर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचंही काही वृत्तांमध्ये म्हटलं होतं. दोघे अनेकदा काही कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसून आले आहेत. एका कार लाँचिंग इव्हेंटमध्ये त्यांची ओळख झाली होती. रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहे. रितू सिंह यांच्याशी लग्न होण्याआधी रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अमृता सिंह स्टेडियममध्ये जाऊन रवी शास्त्री यांना चिअर करायची. पण अमृता आणि रवी यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तर निमरत ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती. निमरत इरफान खानच्या 'लंच बॉक्स'मध्ये झळकली होती. याशिवाय तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारसोबत काम केलं होतं.Fact: I may need a root canal. Fiction: Everything else I read about me today. More facts: Fiction can be more hurtful, monday blues exist and I love ice cream. Here’s to trash free happy days ahead✌????✨
— Nimrat Kaur (@NimratOfficial) September 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement