एक्स्प्लोर

Nilesh Gavand : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेश गावंडचा बोलबाला; उत्कृष्ट संकलनासाठी पुरस्कार

Nilesh Gavand : सर्जनशीलतेच्या जोरावर संकलक निलेश गावंड यांनी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Nilesh Gavand : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2022) नुकतेच जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेश गावंडचा (Nilesh Gavand) बोलबाला पाहायला मिळत आहे. सर्जनशीलतेच्या जोरावर निलेश गावंडने सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेशने संकलित केलेल्या सिनेमांनी बाजी मारली आहे. 

लेखकाच्या आणि संकलकाच्या टेबलवर सिनेमा खऱ्या अर्थाने घडतो असं म्हणतात. सिनेमा चांगला होण्यात महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो. संकलन (Editing) म्हणजे केवळ तांत्रिक प्रक्रिया असा अनेकांचा समज असतो. मात्र संकलकाकडे सर्जनशीलता असणे गरजेचे असते. याच सर्जनशीलतेच्या जोरावर संकलक (Editor) निलेश गावंड यांनी सिनेपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

'श्वास' सिनेमादरम्यान 'सह-संकलक' म्हणून सुरू झालेला निलेशचा प्रवास नुकत्याच जाहीर झालेल्या 'फनरल' सिनेमाच्या राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत सातत्याने सुरू आहे. 'श्वास', 'बाबांची शाळा', 'धग', 'भोंगा', 'फनरल' या सिनेमांना मिळालेल्या राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांच्या यशामध्ये निलेश गावंडच्या संकलनाचाही मोलाचा वाटा आहे. आपण संकलित केलेल्या सिनेमांना सातत्याने मिळणारी यशाची पावती निलेशसाठी मोलाची असल्याचे तो म्हणाला. नवीन काम अधिक जोमाने करण्यासाठी या पुरस्कारांमुळे प्रेरणा मिळते, असंही तो म्हणाला.

निलेश गावंड आज तेवीस वर्ष संकलन क्षेत्रात आहे. 1999 मध्ये प्रकाश मेहरा प्रोडक्शनमधून आपल्या करिअरची सुरुवात करत अनेक मालिका, सिनेमे, डॉक्युमेंटरी, जाहिराती त्यांनी संकलित केल्या. 50 हून अधिक नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत त्याने आजवर काम केलं आहे. गोवा आणि गुजरात सरकारचे उत्कृष्ट संकलनासाठीचे पुरस्कार त्याला मिळाले असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रानबाजार' या लोकप्रिय वेबसीरीजचं संकलनही निलेश गावंडने केलं आहे.

उत्कृष्ट संकलकांच्या यादीत निलेश गावंडचे नाव आवर्जून घेतले जाते. संकलनाच्या कलेविषयी तो म्हणाला,"संकलन म्हणजे दर दिवशी एक वेगळं आव्हान असतं. संकलन हे खूप जिकीरीचं, वेळखाऊ, किचकट आणि पेशन्सचंही काम आहे. या कामावर माझी निष्ठा आहे यामुळेच मी यात संपूर्णपणे समरस झालो आहे. माझ्यासाठी हे क्षेत्र अगदी आवडीचं आहे. राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांमध्ये मी संकलित केलेल्या चित्रपटांना मिळालेलं यश मला समाधान देणारं असलं तरी संकलनाच्या माझ्या या प्रवासात मला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे". 

संबंधित बातम्या

Manoj Muntashir : सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर झाल्याने भारावून गेलो : मनोज मुन्तशिर

National Film Awards 2022 : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया; म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget