एक्स्प्लोर
नवदाम्पत्य 'दीपवीर' मुंबईत, दीपिकाच्या घरी गृहप्रवेश
रणवीरने गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं आहे, तर दीपिकाने ड्रेसवर लाल चुनरी घेतली आहे. दीपिकाने लावलेलं सिंदूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
मुंबई : इटलीतल्या लेक कोमोमध्ये थाटामाटात लग्न केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईत दाखल झाले आहेत. नवदाम्पत्य 'दीपवीर' खारमधल्या दीपिकाच्या घरात गृहप्रवेश करत आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतरचे एक्स्क्लुझिव्ह फोटो 'एबीपी माझा'च्या हाती आले आहेत.
इटलीतल्या लेक कोमोमध्ये 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीनं तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न झालं. विमानतळावर दीपिका-रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रणवीरने गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं आहे, तर दीपिकाने ड्रेसवर लाल चुनरी घेतली आहे. दीपिकाने लावलेलं सिंदूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
इटलीत लग्नसोहळा होत असताना मुंबईतल्या रणवीरच्या घराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. आताही दीपिकाच्या घरी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. काही दिवसांनी वरळीतील नव्या घरी दीपिका-रणवीर शिफ्ट होणार आहेत.
इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा कोंकणी पद्धतीन शाही विवाहसोहळा 14 नोव्हेंबरला पार पडला, तर 15 तारखेला सिंधी पद्धतीने दोघांनी लग्न केलं.
रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी काल लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता.
23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे, तर 28 नोव्हेंबरला मुंबईतही ग्रँड रिसेप्शन होणार आहे.
पाच वर्षांची प्रेमकहाणी
रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती.
'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.
यापूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही इटलीतच साता जन्माच्या गाठी बांधल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूडमधलं आणखी एक कपल याच देशात विवाहबंधनात अडकलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement