Nawazuddin Siddiqui : "गांजा घेतल्यानंतर मला मजा येते"; नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य चर्चेत
Nawazuddin Siddiqui : अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी नुकतचं एका मुलाखतीत व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. गांजा घेतल्यानंतर मला मजा येते, असं ते म्हणाले.
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यांचा 'सेक्शन 108' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. गांजा घेतल्यानंतर मला मजा येते, असं ते म्हणाले.
नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकतचं एका मुलाखतीत त्यांनी दररोज व्यसन करत नसल्याचं सांगितलं आहे. थोडीशी दारू प्यायलानंतरही मला नशा चढते. होळीदरम्यान थंडाई प्यायल्यानंतर दोन दिवस त्यांची नशा उतरली नव्हती.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी 'समदीश अनफिल्टर्ड शो'दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. एनएसडीतील एक किस्सा शेअर करत अभिनेता म्हणाला,"होळी हा माझ्या आवडीचा सण आहे. कारण त्यावेळी थंडाई प्यायला मिळते. एनएसडीमध्ये असताना मी पहिल्यांदा थंडाई प्यायलो होतो. स्वानंद किरकिरे या मित्राने मला थंडाई पाजली आणि मी पितच गेलो. त्यानंतर काही वेळ माझ्यासोबत काय घडत आहे हे मला कळत नव्हतं. दोन दिवस नशा उतरली नव्हती. दारू प्यायल्यानंतर मी महान अभिनेता आहे, असं मला वाटतं. गांजा घेतल्यानंतर मला छान वाटतं. खूप मजा येते. त्यानंतर मी गाणं गायला सुरुवात करतो".
वजन वाढवायला विजय राजने दिलेल्या खास गोळ्या
विजय राजबद्दल बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की,"विजय आणि मी एकमेकांचे चांगले मित्र आहोत. एका खोलीत आम्ही राहायचो. वजन वाढवण्यासाठी विजय राज खास औषधे घेत असे. त्यानंतर त्याने माझं वजन वाढावं म्हणून मलाची त्या गोळ्या दिल्या होत्या. त्या गोळ्यांनी त्यावेळी माझं वजन वाढलं होतं".
View this post on Instagram
नवाजुद्दीनचा मोठा संघर्ष...
नवाजुद्दीनने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात अनेक वर्ष काम करत असूनही त्यांना मुख्य भूमिकेसाठी कोणी विचारणा केली नव्हती. याबद्दल बोलताना नवाजुद्दीन म्हणाले,"मी एक गुणी अभिनेता आहे हे सिद्ध करण्यासाठी 10-12 वर्ष लागली आहेत. पण हा संघर्ष कायम राहणार आहे. आता कुठे लोक माझं काम आणि मला स्वीकारायला लागले आहेत". नवाजुद्दीनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या