एक्स्प्लोर

जुनं रिलेशनशीप उघड, निहारिका नवाझवर नाराज

निहारिका सिंग ही 2005 साली 'फेमिना मिस इंडिया अर्थ' किताबाची मानकरी ठरली होती. 'मिस लव्हली' चित्रपटातून तिने नवाझसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मुंबई : आत्मचरित्राच्या निमित्ताने जुनं रिलेशनशीप उघड केल्यामुळे अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीवर त्याची एक्स गर्लफ्रेण्ड निहारिका सिंग रागवली आहे. केवळ पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी महिलांचा अनादर करण्यातही नवाझ मागेपुढे पाहत नसल्याचा आरोप तिने केला. निहारिका सिंग ही 2005 साली 'फेमिना मिस इंडिया अर्थ' किताबाची मानकरी ठरली होती. 'मिस लव्हली' चित्रपटातून तिने नवाझसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपलं नातं जगजाहीर करण्यापूर्वी संमती न घेतल्यामुळे निहारिका नाराज झाली आहे. ज्याप्रकारे नवाझने माझी प्रतिमा रंगवली आहे, ते पाहता स्वतःच्या पुस्तकाचा खप व्हावा, म्हणून नवाझ महिलांचा अनादर करताना मागेपुढे पाहत नसल्याचं दिसत आहे, असं निहारिका म्हणाली. '2009 मध्ये मिस लव्हली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. आमचं नातं जेमतेम काही महिने टिकलं. माझ्या बेडरुममध्ये कँडल्स लावून मी त्याला बोलावलं, उतावळेपणे त्याला फोन केले, त्याच्या वतीने दुसऱ्या महिलांना ईमेल केले, हे ऐकून तर मला हसूच फुटलं' असं निहारिका म्हणते. 'अर्थातच त्याला त्याचं पुस्तक खपवायचं आहे. त्यासाठी तो महिलांचा अनादर करायलाही तयार असल्याचं दिसतंय' अशी खंत निहारिकाने व्यक्त केली. 'अॅन ऑर्डिनरी लाईफ' या आत्मचरित्रातून नवाझुद्दीन खाजगी आयुष्य आणि रिलेशनशीप्सबद्दल बरंच काही बोलल्याची चर्चा आहे. नवाझुद्दीनने काय लिहिलंय? मी पहिल्यांदाच निहारिकाच्या घरी गेलो. तिने दार उघडताच घराचा एक नजारा दिसला आणि मी भारावून गेलो. शंभर-एक मेणबत्त्या उजळल्या होत्या. तिने अंगावर फर घेतलं होतं. ती फारच गोड दिसत होती. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं. मी धट्टाकट्टा असल्यामुळे तिला कवेत उचलून थेट बेडरुममध्ये घेऊन गेलो. आम्ही अत्यंत आवेगाने प्रेमात बुडालो. अशाप्रकारे अनपेक्षितरित्या आम्ही रिलेशनशीपमध्ये अडकलो. आमचं रिलेशनशीप दीड वर्ष चाललं, असं नवाझ पुस्तकात म्हणतो.

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget