National Film Awards Ceremony 2023: 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आलियानं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. आलियानं तिच्या लग्नसोहळ्यात नेसलेली साडी ही राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली. तिच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
आलियानं तिच्या लग्नसोहळ्यात व्हाईट आणि गोल्डन कलरची साडी नेसली होती. लग्नसोहळ्यात नेसलेली साडी आलियानं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली आहे. आलियानं राष्ट्रीय पुरस्कार सोहळा या खास कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या लूकसाठी तिच्या लग्नातील साडीची निवड केल्यामुळे अनेक नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आलियानं नेसलेली ही साडी सब्यसाचीने डिझाइन केली होती. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलियाने चोकर नेकलेस आणि स्टड इअररिंग असा लूक केला होता.
आलिया ही तिचा पती रणबीर कपूरसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात रणबीर कपूर ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसला.
संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा मुंबईतील कामाठीपुरा येथील वैश्याव्यवसायाशी निगडित असलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात शंतनू माहेश्वरी आणि विजय राज यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
आलिया ही लवकरच जिगरा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: