National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला (National Film Awards 2023) सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडत आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या (Droupadi Murmu) हस्ते  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे. अल्लू अर्जुननं खास लूकमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एन्ट्री केली. त्यानं रेड कार्पेटवर माध्यमांसोबत संवाद साधताना आनंद व्यक्त केला आहे.


अल्लू अर्जुननं आनंद केला व्यक्त


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिलेल्या मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुननं सांगितलं, "मी खूप आनंदी आहे आणि मला दुप्पट आनंद होत आहे कारण हा पुरस्कार एका व्यावसायिक चित्रपटासाठी मिळत आहे." डोळ्यावर चष्मा आणि व्हाईट आऊटफिट असा लूक अल्लू अर्जुननं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी केला आहे.






अल्लू अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' ( Pushpa: The Rise)  या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. आज हा पुरस्कार अल्लू अर्जुनला प्रदान करण्यात येणार आहे.  अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)  तुम्ही 'पुष्पा: द राइज'  हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटामधील डायलॉग्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.  'पुष्पा: द राइज'  या चित्रपटामधील ऊ अंटवा, सामी सामी, श्रीवल्ली या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला.


 पुष्पा-2  चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस


'पुष्पा: द राइज'  या चित्रपटानंतर आता  पुष्पा-2  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.15 ऑगस्ट 2024 रोजी  'पुष्पा: द रूल'  (Pushpa The Rule)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Allu Arjun Pushpa 2:   लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन; अल्लू अर्जुननं शेअर केला 'पुष्पा: द राइज'च्या सेटवरील खास व्हिडीओ