OTT Release This Week : ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध धाटणीच्या आणि दर्जाच्या कलाकृती प्रेक्षक पाहू शकतात. 

ऑक्टोबर महिन्यात हॉरर ते कॉमेडी अशा पद्धतीचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हिंदी, इंग्रजी मराठीसह अनेक भाषांमध्ये या कलाकृती प्रेक्षक पाहू शकतात. एकंदरीत या आठवड्यात प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमे आणि वेबसीरिजबद्दल...

काला पानी (Kaala Paani)कधी रिलीज होणार? 18 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स 

अंदमान आणि निकोबार बेटांच्या काळ्या पाण्यात लोक कसे जगतात हे 'काला पानी' या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सीरिजमध्ये मोना सिंह आणि आशुतोष गोवारीकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर 18 ऑक्टोबरला ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

पर्मनंट रूममेट्स 3 (Permanent Roommates 3)कधी रिलीज होणार? 18 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? अॅमेझॉन प्राईम

'पर्मनंट रूममेट्स' या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ही रोमँटिक वेबसीरिज असून यात निधी सिंह आणि सुमित ब्यास महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये नात्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत. 

एलीट 8 (Elite Eight)कधी रिलीज होणार? 20 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स

तीन वेगळ्या विचारधारा असलेल्या मुलांची गोष्ट 'एलीट 8'मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाट्यमय सीरिजचा आठवा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सातही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 20 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर 'एलीट 8' ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

अपलोड सीझन 3 (Upload Season 3)कधी रिलीज होणार? 20 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ

'अपलोड सीझन 3' ही विनोदी सीरिज आहे. 20 ऑक्टोबरला प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. 'अपलोड सीझन 3' या सीरिजमध्ये एका व्यक्तीची मृत्यूनंतरची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विनोद आणि नाट्य या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

दूनाकधी रिलीज होणार? 20 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स

'दूना' ही सीरिज 20 ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ली जियोंग यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 

क्रिएचर (Creature)कधी रिलीज होणार? 20 ऑक्टोबरकुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स

'क्रिएचर' या सिनेमात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 20 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होईल.

संबंधित बातम्या

Kaala Paani Trailer : 'काला पानी'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट! आशुतोष गोवारीकर अन् अमेय वाघ मुख्य भूमिकेत