National Film Awards 2022 Winners List : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2022) घोषणा झाली आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा', तर अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला 'लोकप्रिय हिंदी सिनेमा'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. जाणून घ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...
चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश
सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुन्तशिर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची
पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार : राहुल देशपांडे
उल्लेखनीय फिचर फिल्म : जून (मराठी), गोदाकाठ (मराठी), अवांछित (मराठी)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा : तान्हाजी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी सिनेमा : अनिश गोसावी (टकटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण
सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा : फनरल (मराठी)
सर्वोत्कृष्ट बालपट : सुमी
सर्वोत्कृष्ट साऊंड इंजिनिअर- अनमोल भावे (मी वसंतराव)
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक : विशाल अय्यर (परीह)
कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपट नॉन-फिचर फिल्म श्रेणी : कुंकुमार्चन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात. 'तान्हाजी' सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती.
संबंधित बातम्या