68th National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) आज (22 जुलै) घोषणा झाली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 


'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत' मराठीचा बोलबाला


'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पाश्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 


गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना किशोर कदम म्हणाले की,"राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची नोंद घेतली गेली याचा आनंद झाला. दोन चित्रपटांतील कामाची दखल घेतली गेली. दोन्ही चित्रपटांमध्ये मी मन लावून काम केलं आहे. 






'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या चित्रपटातील अभिनेत्री सायली संजीव हिने आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतली होती, आता त्या गोष्टीचं चिज झाल्याचं ती म्हणाली. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सायली संजीव हिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासंदर्भात 


मनोरंजन सृष्टीत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. चांगले सिनेमे तयार व्हावेत आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक पुरस्कारासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी या पुरस्कारांची नावं आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींकडे सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. 


संबंधित बातम्या


68th National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार! पुरस्कारांसाठी ‘या’ चित्रपटांची नावे चर्चेत