JugJugg Jeeyo On OTT : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा बहुप्रतीक्षित ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पुन्हा पदार्पण केल्याने, त्यांच्या निर्णयाचे खूप कौतुक झाले. ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार असून, तो प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.


ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Videoवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. Amazon Prime Day अर्थात 23-24 जुलैला प्रेक्षकांना चित्रपटांची विशेष मेजवानी मिळणार आहे. तर, 23 जुलैला ‘जुग जुग जियो’ चित्रपट देखील रिलीज होणार आहे. सबस्क्रिप्शन असणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हा चित्रपट पाहता येणार आहे.


जगभरात पार केला 100 कोटींचा टप्पा


कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या चित्रपटत प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या चित्रपटत अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटने जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.


तगडी स्टारकास्ट


नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या चित्रपटच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. चित्रपटत असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या चित्रपटची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि तो घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'च्या निर्मात्यांना बसला आर्थिक फटका; कमाईच्या बाबतीत पडला मागे


Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जियो’चा धुमाकूळ; तीन दिवसात कमावले 60 कोटी