नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इवांका ट्रम्पही आली होती. यादरम्यान, संपूर्ण ट्रम्प कुटुंब आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी गेलं होतं. त्यादरम्यानचे काही फोटो इवांका ट्रम्पने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले होते. इवांकाच्या या फोटोंवर फोटोशॉप करून मीम्स तयार करण्यात आले आहेत. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस होत आहेत. ज्यामध्ये एक मीम अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजने देखील तयार केलं होतं.





खास गोष्ट म्हणजे, दिलजीत दोसांजच्या मीम्सवर इवांकाने रिप्लाय केला आहे. एवढचं नाहीतर दिलजीत दोसांजनेही इवांकाला पुन्हा उत्तर दिलं आहे. दिलजीतने इवांकाला ट्वीट करत सांगितलं की, 'ओएमजी, अतिथी देवो भव:... धन्यवाद इवांका ट्रम्प, मीसुद्धा सर्वांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, आपला फोटो अजिबात एडिट केलेला नाही. लवकरच पुन्हा भेटूयात. पुढच्या वेळी नक्की लुधियानाला जाऊ. हुण करो गल.'





इवांका ट्रम्पने उत्तर देण्याआधी दिलजीतने एक फोटो शेअर केला होता. ज्याणध्ये त्याने फोटोशॉप मार्फत इवांकाच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो एडिट केला होता. त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, 'मी आणि इवांका. माझ्या मागेच लागली होती, म्हणत होती ताजमहाल पाहायचाय. मग मी घेऊन गेली आणि काय करू शकत होतो.'





दिलजीतच्या या ट्वीटनंतर इवांकाने दिलजीतचं ट्वीट रिट्वीट करत लिहिलं की, 'मला सुंदर ताजमहाल दाखवण्यासाठी खरचं धन्यवाद दिलजीत दोसांज. हा अशा क्षण होतो, जो मी कधीच विसरू शकत नाही.' दरम्यान, इवांकाने हे ट्वीट गंमत म्हणून केलं होतं. याव्यतिरिक्त इवांकाच्या ताजमहालच्या फोटोवर इतरही अनेक मीम्स व्हायरल होत असून इवांकाने हे मीम्स आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत.


संबंधित बातम्या : 


एकता कपूरच्या कॅम्पमध्ये सामील झाला एक नवीन चेहरा


VIDEO | दिशा पाटनीचा बोल्ड डान्स; चाहते घायाळ


Sheer Qorma Trailer | 'शीर कोरमा'चा ट्रेलर रिलीज; होमोसेक्शुअल जोडप्याच्या भूमिकेत स्वरा भास्कर, दिव्या दत्त