Sheer Qorma Trailer : आयुष्मान खुराणा स्टारर चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' काही दिवसांपूर्वी रिलीज झाली असून चाहत्यांना आवडत आहे. या चित्रपटात होमोसेक्शुअल लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. आता याच विषयावर आधारीत शबाना आजमी, स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता स्टारर चित्रपट 'शीर कोरमा'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये दोन होमोसेक्शुअल महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.





चित्रपटाचं दिग्दर्शन फरज आरिफ अंसारी यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता होमोसेक्शुअल जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, 'स्वरा भास्कर पाकिस्तानी-कॅनडाची महिलेच्या भूमिकेत आहे. जी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आली आहे.


चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहू शकता की, दिव्या दत्ता आपली आई (शबाना आझमी) ला सत्य स्वीकारताना पाहू इच्छिते. त्यासाठी तिला इमोशनल ट्रॉमाचा सामनाही करावा लागतो. दरम्यान, यामध्ये दिव्या दत्ता यांचा भाऊ त्यांची मदत करतो.


'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज


चित्रपटाबाबत दिग्दर्शकांचं म्हणणं आहे की, त्यांनी या चित्रपटासाठी स्वरा, दिव्या आणि शबाना यांना त्यांच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहेत. हे सर्व कलाकार LGBTQ समुदायाबाबतचे आपले विचार अनेकदा व्यक्त करत असतात. दरम्यान, हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार नाही. ट्रेलरच्या शेवटी देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट फिल्म फेस्टिवल्समध्ये दाखवण्यात येणार आहे.


पाहा ट्रेलर :