मुंबई : 'लव्ह आज कल 2' मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात खास स्थान बनवणारी अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. प्रणती लवकरच ऑल्ट बालाजीच्या वेब सिरीज 'कार्टेल' मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे, आणि तिच्या भूमिकेबद्दल जर आपण बोललो तर ही कथा तिच्या वास्तविक जीवनापेक्षा खूप वेगळी आहे.
ही मालिका अल्ट बालाजीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रित्विक धनंजानी , सुप्रिया पाठक, तनुजा विरवानी सारखे अभिनेते दिसणार आहे. निश्चितपणे 'कार्टेल' चाहत्यांसाठी एक मजेदार अनुभव असेल. या वेब सिरीजला दिग्दर्शक सुयश वाधवकर करीत आहेत.
अभिनेत्री प्रणती 'कार्टेल' मधील तिच्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे, ती म्हणाली, 'माझी भूमिका सुमी माझ्यापेक्षा खूपच वेगळी आहे, तरीही मी त्या भूमिकेला स्वतःशी कनेक्ट करू शकते. मी नेहमीच माझ्या भूमिकेला एक आव्हान म्हणून घेते आणि ती व्यक्तिरेखा साकारण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करते, म्हणूनच मला माझे काम आवडते, कारण या कामातून मला बरेच काही शिकायला मिळते. मी सुमीची भूमिका प्रेक्षकांसमोर खूप सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतेय आहे.'
प्रणतीच्या आतापर्यंतच्या प्रवास म्हणजे 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल' ते 'लव्ह आज कल 2' पर्यंतचा प्रवास साधारण नव्हता. तिने फक्त मॉडलिंग विश्वात आपले नाव कमावले नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नाव मिळवले आहे.
2020 मध्ये प्रणती वेब सीरिजसोबत अनेक चित्रपटात दिसणार आहे, ज्याचा ती लवकरच खुलासा करणार आहे.
एकता कपूरच्या कॅम्पमध्ये सामील झाला एक नवीन चेहरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2020 11:14 PM (IST)
प्रणतीच्या आतापर्यंतच्या प्रवास म्हणजे 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल' ते 'लव्ह आज कल 2' पर्यंतचा प्रवास साधारण नव्हता. तिने फक्त मॉडलिंग विश्वात आपले नाव कमावले नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नाव मिळवले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -