एक्स्प्लोर
झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार
आरोपी सरफराज काही दिवसांपासून माझा पाठलाग करत होता. तसंच व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी सांगितलं.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एका बिझनेसमनवर विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
68 वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, 27 जानेवारी रोजी सरफराजने बिल्डिंगखाली येऊन मला धमकावलं. तसंच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला मारहाणही केली.
आरोपी सरफराज काही दिवसांपासून माझा पाठलाग करत होता. तसंच व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचा आरोप झीनत अमान यांनी सांगितलं.
पोलिसांनी सरफराजविरोधात 354 (ड) (पाठलाग करणं), 509 आयटी अॅक्ट (महिलेला धमकी देणं) तसंच इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरफराज सध्या पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, 38 वर्षीय आरोपी सरफराज एकेकाळी फिल्ममेकर होता. तसंच काहींच्या मते, तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात सक्रीय आहे. तर मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं काहींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement