एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'इंदू सरकार'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने याचिका फेटाळली
संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉलची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.
मुंबई : आणीबाणीवर आधारित सिनेमा 'इंदू सरकार'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे.
इंदू सरकारविरोधात प्रिया पॉलने याचिका केली होती. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांची प्रतिमा या सिनेमातून मलीन करण्यात आल्याचा दावा प्रिया पॉल यांनी केला होता.
आणीबाणीवर या अगोदरही अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत. सिनेमातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत. प्रिया पॉलने स्वतःला संजय गांधी यांची मुलगी असल्याचं सिद्ध करुन दाखवण्यासाठी याचिका दाखल केली होती, असा दावा सिनेमाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि निर्मात्यांकडून करण्यात आला.
काय आहे वाद?
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. मात्र या सिनेमात काँग्रेसची बदनामी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवाय हा सिनेमा भाजपने स्पॉन्सर केल्याचा दावाही काँग्रेसने केलाय. ज्यामुळे काँग्रेसकडून सिनेमाला विरोध केला जात आहे.
अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
आणीबाणीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास आणि देशातील आणीबाणीची परिस्थिती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होईल.
संबंधित बातम्या :
इंदू सरकारचं पुण्यातील प्रमोशन काँग्रेसनं हाणून पाडलं
सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?
‘इंदू सरकार’ न दाखवता रिलीज केल्यास कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील: विखे
इंदू सरकार, संजय गांधी आणि ‘ती’!
‘इंदू सरकार’ला नोटीस पाठवणारी ‘प्रिया सिंग पॉल’ कोण?
‘इंदू सरकार’च्या निर्मात्यांना नोटीस, सिनेमाच्या बंदीची मागणी
आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’चा ट्रेलर रिलीज
‘इंदू सरकार’चा ट्रेलर :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement