एक्स्प्लोर
गुगलवर अक्षयचा पत्ता शोधून मध्यरात्री घरात घुसण्याचा प्रयत्न, फॅन अटकेत
या चाहत्याची ओळख पटली असून अंकित गोस्वामी असं त्याचं नाव आहे. तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. अंकित गोस्वामी अक्षय कुमारचा चाहता आहे. केवळ त्याला भेटण्यासाठी तो मुंबईला आला होता.

मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या जबरा फॅनचे अनेक किस्से/उदाहरणं आपण ऐकतो किंवा पाहतो. अनेकदा काही चाहते आवडत्या कलाकारासाठी मर्यादा ओलांडण्याचाही प्रयत्न करतात. यावेळी अक्षय कुमारच्या एका चाहत्याने काहीसं असंच केलं. 22 वर्षीय चाहत्याने परवानगीशिवाय जबरदस्तीने अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या चाहत्याची ओळख पटली असून अंकित गोस्वामी असं त्याचं नाव आहे. तो मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. अंकित गोस्वामी अक्षय कुमारचा चाहता आहे. केवळ त्याला भेटण्यासाठी तो मुंबईला आला होता. त्याने गुगलच्या मदतीने अक्षय कुमारचा पत्ता शोधला. त्यानंतर सोमवारी (5 फेब्रुवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास तो अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी सुरक्षारक्षकाने चाहत्याला पाहिलं आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. "जुहू पोलिसांनी त्याची चौकशी करुन मंगळवारी अटक केली. त्याच्यावर परवानगीशिवाय घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे," अशी माहिती पोलिस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दिली. मागच्या वर्षीही अशीच एक नाट्यमय घटना सलमान खानसोबत घडली होती. सलमानची एक चाहती गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचली आणि आपण त्याची पत्नी असल्याचा दावा करु लागली. पतीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही, असा आरडाओरडा करत होती.
आणखी वाचा























