एक्स्प्लोर
लोकप्रिय ‘मोगली’ नेटफ्लिक्सवर येणार
नेटफ्लिक्सच्या माध्यमातून 'मोगली' पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे. “मोगली : दी लेजंड ऑफ जंगल”चे हिंदी व्हर्जन 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
![लोकप्रिय ‘मोगली’ नेटफ्लिक्सवर येणार Mowgli Hindi voice cast has Anil Kapoor playing Baloo, Abhishek as Bagheera लोकप्रिय ‘मोगली’ नेटफ्लिक्सवर येणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/20213503/mowgli.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नेटफ्लिक्स त्यांचा नवा चित्रपट “मोगली : दी लेजंड ऑफ जंगल”चे हिंदी व्हर्जन घेऊन आपल्यासमोर येत आहे. यामध्ये अभिनेता अनिल कपूर, अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चन विविध पात्रांना आवाज देणार आहेत. तसेच यामध्ये माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांचादेखील आवाज ऐकायला मिळणार आहे.
मोगलीचा मित्र ‘बगीरा’ म्हणजेच ब्लॅक पँथरला अभिनेता अभिषेक बच्चन आवाज देणार आहे. इंग्रजी व्हर्जनमध्ये बॅटमॅन म्हणून ओळख असणाऱ्या ख्रिश्चियन बेल या अभिनेत्याने बगीरा या पात्राला आवाज दिला आहे. अभिनेता अनिल कपूर ‘बालू’ या अस्वलाला आवाज देणार आहे. तर ‘शेर खान’ या पात्राला अभिनेता जॅकी श्रॉफ आवाज देणार आहे. माधुरी दीक्षित आणि करिना कपूर कोणत्या पात्रांना आवाज देणार आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही.
फ्रिडा पिंटोचा आवाज हिंदीमध्ये मोगलीचा सांभाळ करणाऱ्या ‘मीसा’ या पात्राला फ्रिडा पिंटो हिने आवाज दिला आहे. 25 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा मुंबईत वर्ल्ड प्रिमियर होणार आहे.
. @NetflixIndia pic.twitter.com/QlvJE219oh
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 20, 2018
So happy to be a part of a story I have loved all my life. He is ready to do whatever it takes to keep Mowgli alive. Wait for Bagheera in Mowgli: Legend Of The Jungle on @Netflixindia Dec 7. pic.twitter.com/ptK5IrvXUK
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)