एक्स्प्लोर

मुंबईत अजून एका मॉडेलची संशयास्पद आत्महत्या

मुंबईः खागजी आयुष्यातील घुसमटीमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना अंधेरीमध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडसोबत झालेला वाद आणि खाजगी आयुष्यातील अडचणी या मॉडेलच्या मृत्यूचं कारण असल्याचं बोललं जात आहे.     बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत नाव कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मुंबईची वाट धरतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करता करता अनेकांच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही अभिनेत्री देखील याच परिस्थितिचा बळी असण्याची शक्यता आहे.   का केली आत्महत्या? मॉडेल करमजीत कौर उर्फ नेहा बॉलिवूडमध्ये करीअर करण्याचं स्वप्न घेऊन दिल्लीहून मुंबईत आली. पण करमजीतचं स्वप्न अर्धवट राहिलं. काल रात्री करमजीतने अंधेरीतल्या सहजीवन सोसायटीत पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. छोटा पडद्यावरुन बॉलीवूडमध्ये जाण्याची धडपड आणि खासगी आयुष्याची घुसमट यातच करमजीतचा अंत झाला.     करमजीत तिचा प्रियकर दीपेंद्रसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. तिला दीपेंद्रसोबत लग्न करायचं होतं आणि याच कारणावरुन तिचं दीपेंद्रसोबत काल रात्री भांडण झालं. पण दीपेंद्र घराबाहेर गेल्यानंतर तिने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. करमजीतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी दीपेंद्रची देखील चौकशी सुरु केली आहे.     जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी आणि आता करमजीत कौर. सिनेसृष्टी आणि छोट्या पडद्यावरची ही अशी नावं आहेत, जी मृत्यूनंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळं आयुष्यासाठी केवळ पैसा आणि प्रसिद्धीच नव्हे, तर खासगी आयुष्याची स्थिरताही गरजेची असते, हेच या घटनांवरुन लक्षात येतं.

महत्त्वाच्या बातम्या

नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 

व्हिडीओ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
नशिबच! आम्हाला दवाखान्यात जावं लागलं, तितक्यात तिथं प्रलय आला; नेपाळहून मुंबईत येताच पर्यटकांनी सांगितला जीवन-मरणाचा किस्सा
Adivasi Student Protest : 12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
12500 पदांची भरती, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरु होणार, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील निर्णय एका क्लिकवर
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
Bombay High Court :  मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Embed widget