Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
Ration Card EKYC : रेशन कार्ड ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुंबई : रेशनकार्डची केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही रेशनकार्डची केवायसी केली नाही तर तुम्हाला आता रेशन मिळणार नाही. यासोबत तुमचे नाव रेशनकार्डवरून देखील कमी केले जाऊ शकते. त्यामुळे आज आपण रेशनकार्डची केवायसी कशी करायची हेच जाणून घेणार आहोत.
रेशनकार्डची केवायसी करण्याच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने केवायसी करू शकता.
ऑफलाईन केवायसी कशी करायची?
ऑफलाईन पद्धतीने रेशनकार्डची केवायसी करायची असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचे रेशनकार्ड घेऊन तुमच्या रेशनदुकानदाराकडे जायचं आहे. त्यानंतर तुमचं आधारकार्ड नंबर आणि फिंगरप्रिंट स्कॅन करून तुम्ही केवायसी करू शकता.
ऑनलाईन केवायसी कशी करायची?
जर तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन केवायसी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहेत.
1. मेरा ई-केवायीसी
2. आधार फेसआरडी
हे दोन ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर सुरुवातीला मेरा ई-केवायसी ॲप उघडा. इथे तुम्हाला तुमचे आधार क्रमांक टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो इथे भरा. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशनकार्डची माहिती आली असेल. आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन द्वारे केवायसी पूर्ण करायची आहे. त्यामुळे तुम्हाला आधार फेसआरडी या ॲपचा वापर करावा लागेल. रेशनकार्डची माहिती भरल्यावर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी तुमच्या कॅमऱ्याला परवानगी द्या. परवागणी दिल्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमच्या चेहरा स्कॅन करायचा आहे. त्यात लाईट व्यवस्थित असायला हवं. यासोबत तुमच्या डोळ्यांची हालचाल करा, जेणेकरून सिस्टीमला तुमचा चेहरा ओळखण्यात मदत होईल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशनकार्डची केवायसी ऑनलाईन पद्धतीने करू शकता..
महत्त्वाच्या बातम्या























