एक्स्प्लोर

Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रिक्षा टॅक्सीचालकांवर सुरु असलेली कारवाई थांबवली आणि त्यांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदत दिली. त्यामुळे शिवसेनेकडं असलेल्या परिवहन खात्याच्या एका महत्त्वाकांक्षी धोरणाला एक प्रकारे ब्रेक लागला. अचानक लागलेल्या हा ब्रेकचा धक्का पचवण्याचा प्रयत्न शिवसेना करत असली तरी त्यांच्या मनातली खदखद मात्र लपून राहिलेली नाही. एकीकडं मुख्यमंत्र्यांनी दिलेला धक्का आणि दुसरीकडे विरोधकांची टीका असा दोन्ही बाजूंचा मारा सहन करताना शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागत असल्याचं दिसतंय. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 

महाराष्ट्रातील अमराठी रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवून त्यांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केली.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळं शिवसेनेत आलेले भूकंपाचे हादरे दुसऱ्या दिवशीही जाणवत राहिले.

घोषणेला थेट विरोधही करता येत नाही आणि मराठीचा मुद्दा सोडताही येत नाही, अशा अवस्थेत सध्या शिवसेना येऊन ठेपलीय. 

त्यामुळं गेल्या तीन महिन्यात किती अमराठी लोक मराठी शिकले, हे सांगण्यावर सध्या शिवसेनेनं भर दिल्याचं दिसतंय. 

नव्यानं पालकमंत्री झालेले भरत गोगावले हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला रिक्षालचाकांना देतायत. 

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचा शॉक शिवसेना सहन करत असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनंही टीकेचं व्होल्टेज वाढवलंय. 

भाजप दादागिरी करत असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊतांनी परिवहन मंत्र्यांनाही एक आव्हान दिलंय. 

तर भाजपनं मात्र मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचं सांगत रिक्षाचालकांच्या मराठी शिकण्याच्या क्षमतेचा विचार मांडलाय.

तर हा मुद्दा केवळ भाजप आणि शिवसेनेतल्या संघर्षापुरता मर्यादित नसल्याची आठवण ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी करून दिलीय. 

ठाकरेंची शिवसेनेनं रिक्षाचालकांना दिलेल्या प्रशिक्षणाचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलाय. 

या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री आणि खिशातले राजीनामे हा विषय जिवंत झालाय.

संघर्ष राजकीय पक्षांमधला असला तरी मुद्दा मराठीचा असल्यामुळे मराठी एकीकरण समितीही आक्रमक झालीय. 

त्यांना फडणवीसांच्या रुपात दिसू लागलेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कट्टर विरोधक मानले जाणारे स. का. पाटील.

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी आलं पाहिजे, याबाबचा मूळ कायदा १९८८ साली करण्यात आला.

त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्ये सुधारित जीआर काढून मराठी अनिवार्य करण्याबाबतच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आला. 

मूळ नियम लागू झाल्याला ३५ वर्षं उलटल्यानंतर यंदा याची अंमलबजावणी सुरु झाली.
आणि आता पुन्हा एका वर्षाची याला मुदतवाढ मिळालीय. 

त्यामुळं मराठीसक्तीच्या या गोष्टीत कधी मराठीचं प्रेम जागृत होईल आणि कधी राजकीय गणिताची सक्ती आडवी येईल, काहीच सांगता येत नाही. 







All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Embed widget