Mister Mummy First Look :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. जेनेलिया आणि रितेशचे सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. रितेश आणि जेनेलिया यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली. त्यांनी 'मिस्टर मम्मी' (Mister Mummy) या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये रितेश चक्क प्रेग्नंट दिसत आहे. 


'मिस्टर मम्मी' या रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटाची निर्मीती  भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया हे दोघेही  प्रेग्नंट दिसत आहेत. 


मिस्टर मम्मी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून जेनेलियानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'पोट दुखेपर्यंत हसण्यासाठी तयार व्हा. कधीही न पाहिलेली कथा लवकरच तुमच्या भेटीस येत आहे.'






जेनेलिया आणि रितेश यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. त्यांची पहिली भेट 2003 मध्ये  तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान  झाली. या चित्रपटामुळे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. नंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.





महत्वाच्या बातम्या :


Farhan Akhtar And Shibani Dandekar : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर बांधणार लग्नगाठ; जावेद अख्तर म्हणाले...


Amitabh Bachchan : बिग बींनी दिल्लीतील वडिलोपार्जित बंगला विकला; 'सोपान'ला मिळाली इतकी किंमत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha