Sunil Grover Heart Surgery : प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर (Sunil Grover) नुकतीच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सुनील ग्रोव्हरची तब्येत ठीक असून आज त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. 


हृदयविकारामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात सुनील ग्रोव्हर याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. एबीपी न्यूजला माहिती देताना रुग्णालयातील एका सूत्राने सांगितले की, उपचारानंतर सुनील ग्रोवरची प्रकृती ठीक असून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. हृदयाशी संबंधित गंभीर आजारामुळे 27 जानेवारी रोजी सुनील ग्रोवर याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 


गुरुवारी रूग्णालयाच्या सूत्राने एबीपी न्यूजला सांगितले की, "हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोवरची तब्येत बरी आहे. त्याला खूप चांगले वाटत असून त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माच्या शोमध्ये विविध पात्रे साकारली. त्यामध्ये त्याने खूप लोकप्रियता मिळवली. यासोबतच अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शाहरुख खान यांची मिमिक्री करण्यात त्याचा हातखंडा आहे. 


सुनील ग्रोव्हरला चाहते त्याच्या 'गुत्थी' या पात्रामुळेच ओळखतात. त्याने कपिल शर्मा शोमध्ये 'गुत्थी' हे पात्र साकारून लोकांना खूप हसवले होते. शोचा होस्ट कपिल शर्मासोबतच्या वादानंतर त्याने हा शो सोडला. परंतु, त्याचे 'गुत्थी' हे पात्र आजही सर्वांच्या हृदयात कोरलेले आहे.


कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा त्याच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मुळे नेहमी चर्चेत असतो. अभिनेता सुनील ग्रोव्हर(Sunil Grover)'द कपिल शर्मा शो' च्या टीमचा भाग होता. त्यावेळी या कार्यक्रमाचे नाव 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' असं होते. पण रिपोर्टनुसार, सुनील आणि कपिलचं भांडण झाल्यामुळे सुनिलनं शो सोडण्याचा निर्णय घेतला.


महत्वाच्या बातम्या


... म्हणून सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाला, कपिल शर्माचं स्पष्टीकरण


...म्हणून सुनील ग्रोव्हर कपिलसोबत काम करण्यास तयार?