Farhan Akhtar, Shibani Dandekar Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर ( Farhan Akhtar ) आणि  मॉडेल शिबानी दांडेकर ( Shibani Dandekar ) हे विवाहबंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी  फरहान आणि शिबानी यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे, असं म्हटलं जात आहे. अनेक वर्ष फरहान आणि शिबानी हे एकमेकांना डेट करत होते. फरहानचे वडील जावेद अख्तर ( Javed Akhtar ) यांनी नुकतीच शिबानी आणि फरहानच्या लग्नाबद्दल माहिती दिली. 


जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'लवकरच फरहान आणि शिबानी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. सध्या लग्नाची तयार सुरू आहे. या विवाह सोहळ्याची तयारी वेडिंग प्लॅनर करत आहेत.' तसेच त्यांनी सांगितले की, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लवकरच आम्ही लग्नपत्रिका वाटणार आहोत.      


फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट  घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 






फरहानच्या रॉक ऑन! , लक बाय चान्स (२००९),  कार्तिक कॉलिंग कार्तिक, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच फरहान एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत.