Sukesh ChandraShekhar, Jacqueline Fernandez  : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात  होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटो व्हायरल देखील झाला होता. या फोटोमध्ये जॅकलिन आणि सुकेश रोमॅंटिक पोज देताना दिसत होते. या फोटोबद्दल आता सुकेशनं प्रतिक्रिया दिली आहे. गुरूवारी (3 फेब्रुवारी) सुकेशनं एक पत्र जाहीर केली.


सुकेशनं वकिलाच्या माध्यमातून मीडियासाठी एक पत्र जाहीर केले. या पत्रात सुकेशनं लिहिले, 'मी माझ्या प्रायव्हेट फोटोला पाहिले. हा फोटो व्हायरल झाल्यामुळे मी नाराज आहे. या फोटोबद्दल मला गेल्या आठवड्यात कळाले. आमच्या प्रायव्हसी आणि पर्सनल स्पेसचे उल्लंखन करण्यात आलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की जॅकलिनला या सर्व गोष्टींमध्ये घेऊ नये. तिला याचा त्रास होऊ शकतो.    ' 


'मी या आधी देखील सांगितले होते की जॅकलिन आणि मी एकमेकांना डेट करत होतो. पैशांसाठी आमचं प्रेम नव्हतं. अनेकांनी आम्हाला या गोष्टींसाठी ट्रोल केले आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो. तसेच एकमेकांचा आदर देखील करत होतो. आम्हाला एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. ', असंही सुकेशनं पत्रात लिहिले. 


जॅकलिनला दिलेल्या गिफ्ट्सचा उल्लेख देखील सुकेशनं या पत्रात केला आहे. सुकेशनं लिहिलं, ' काही गिफ्ट्स मी जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला दिले आहेत. ती नॉर्मल गोष्ट आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण गिफ्ट देऊ शकतो. मी विनंती करतो की सर्वांनी जॅकलीनला सपोर्ट करा कारण तिनं काहीच चुकीचं केलं नाही.'


सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच महागडी जनावरं 
सुकेश चंद्रशेखर  या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या :


Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं घेतली नवी बाईक; किंमत माहितीये?


Farhan Akhtar And Shibani Dandekar : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर बांधणार लग्नगाठ; जावेद अख्तर म्हणाले...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha