आधी मैत्री अन् नंतर संसार थाटणाऱ्या बॉलिवूडमधील जोड्या!
Continues below advertisement
जेनेलिया डिसूजा, रितेश देशमुख
Continues below advertisement
1/6
अंगद बेदी आणि नेहा धूपिया दोघेही सेलिब्रिटी आहेत, जे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांचे नाते मैत्रीपासून सुरू झालं आणि त्याचं कधी प्रेमात रूपांतर झालं त्यांनाही कळलं नाही. अखेर या दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघेही एका सुंदर मुलीचे पालकही बनले आहेत.
2/6
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांनी 2012 साली एकमेकांशी लग्न केले होते. पण त्यांची पहिली भेट 2003 मध्ये झाली, जेव्हा दोघे तुझे मेरी कसम या चित्रपटासाठी एकत्र आले होते. हा त्यांचा पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटामुळे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. कालांतराने ही मैत्री इतकी पक्की झाली की दोघेही नात्यात आले. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले.
3/6
ऋषि कपूर आणि नीतू सिंहही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्या रिलेशनशिपची खास गोष्ट म्हणजे आधी नीतू सिंगला ऋषि कपूर अजिबात आवडत नव्हता. तिला त्याचा खोडसाळपणा आवडला नाही, परंतु हळूहळू तिला त्यांची कंपनी आवडली. दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांना चांगलीच भावली आणि दिग्दर्शकांनी या जोडीला एकाच वेळी बर्याच चित्रपटांमध्ये साइन करण्यास सुरवात केली. तिथे काम करत असताना दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि मग त्यांचे लग्न झाले.
4/6
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हेही त्या जोडप्यांपैकी एक आहे, ज्यांनी लग्नाआधी एकमेकांशी चांगली मैत्री केली. आपल्या कारकीर्दीत ऐश्वर्या आणि अभिषेकने बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांनीही पहिल्यांदा ढाई अक्षर प्रेम के चित्रपटात काम केले. इथूनच त्यांची मैत्री सुरू झाली. त्यांचा दुसरा चित्रपट होता कुछ ना कहो.
5/6
या दोन चित्रपटांच्या दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या दोघे रिलेशनशिपमध्ये होते. परंतु 2003 पर्यंत, जिथे ऐश्वर्या सलमान आणि विवेकपासून विभक्त झाली होती, तर अभिषेकचे करिश्माशी असलेले संबंध तुटले होते. दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होते. पण पुन्हा दोघे काही चित्रपटांसाठी एकत्र आले आणि यावेळी प्रकरण मैत्रीच्या पलीकडे गेले. शेवटी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि अॅश हो म्हणाली.
Continues below advertisement
6/6
सोहा अली खान आणि कुणाल खेमू देखील पहिल्यांदाच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. सुरुवातीला, दोघेही एकमेकांशी बोलण्याशी कचरत होते. पण जेव्हा 2009 मध्ये हे दोघे 99 चित्रपटांच्या शूटिंगसाठी एकत्र आले, तेव्हा त्यांची मैत्री सुरू झाली. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर त्यांचे लग्न झाले.
Published at : 21 Mar 2021 10:32 PM (IST)