(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mismatched Season 2: प्राजक्ता कोळी-रोहित सराफची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज! कुठे आणि कधी पाहता येणार ‘मिसमॅच 2’, जाणून घ्या...
‘Mismatched’ या प्रसिद्ध सीरिजचा पहिला सीझन नोव्हेंबर 2020मध्ये प्रसारित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
Mismatched Season 2: युट्यूबर प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आणि अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) यांच्या ‘Mismatched’ या प्रसिद्ध सीरिजचा पहिला सीझन नोव्हेंबर 2020मध्ये प्रसारित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीसोबत रणविजय सिंह देखील दिसला होता. आता जवळपास 2 वर्षांनंतर, मेकर्सनी ‘मिसमॅच’च्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली होती. ‘मिसमॅच सीझन 2’बद्दल (Mismatched Season 2) प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता ही सीरिज रिलीज करण्यात आली आहे.
कुठे आणि कधी पाहता येईल?
‘मिसमॅच सीझन 2’ सध्या Netflix वर रिलीज करण्यात आला आहे. ‘मिसमॅच सीझन 2’ (Mismatched Season 2) 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता रिलीज झाला आहे. संपूर्ण सीझन नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार केव्हाही या सीरिजचा आनंद घेऊ शकतात.
नेटफ्लिक्सच्या सीरिजचा हा नवा सीझन आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी, रडवण्यासाठी आणि कॉलेजच्या गोड दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 'मिसमॅच'चा पहिला सीझन 2020मध्ये रिलीज झाला होता. पहिल्या सीझन प्रमाणाचे या सीझनमध्येही प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
नवीन सीझनमध्ये प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांच्यासोबत काही नव्या चेहऱ्यांची एन्ट्री देखील होणार आहे. विहान सामंत, मुस्कान जाफरी, तारुक रैना, रणविजय सिंह, विद्या मलावदे, कार्तिक भारद्वाज, अभिनव शर्मा आणि दिव्यानी शौरी देखील या सीझनमध्ये दिसणार आहेत. यासोबतच या सीझनमध्ये प्रिया बॅनर्जी, अहसास चन्ना आणि संजय सराठे हे नवे चेहरेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
नव्या सीझनमध्ये पहिल्या सीझनमधील सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळू शकतात. अरवलीमधील विद्यार्थ्यांची ही कथा तुम्हाला कधी रडवेल, कधी हसवेल आणि कधी कॉलेजच्या गोड दुनियेत, अनेक ठिकाणींमध्ये घेऊन जाईल. डिंपल आणि ऋषी यांच्या प्रेमाभोवती फिरणारी ही कथा रोमांचक असणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सीरिजचा दुसरा सीझन जयपूरमधील समर कोर्सला उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशातील ‘मिसफिट’ लोकांच्या समूहावर केंद्रित आहे. आपले भविष्य धोक्यात घालून ही टीम स्वतःची ओळख, गुंडगिरी, मानसिक आरोग्य आणि अनेक शारीरिक समस्यांना सामोरी जाते. या सीरिजचा ट्रेलर चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आवडला होता.
हेही वाचा :
PHOTOS : ब्लॅक ड्रेस अन् क्लासी अदा; प्राजक्ता कोळीच्या अदांवर सारेच फिदा