अर्जुन कपूर फसला भूमी अन् रकुलच्या प्रेमात, 'मेरे हजबंड की बिबी' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर लॉन्च
Mere Husband Ki Biwi Trailer : अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या मेरे हजबंड की बिबी हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.

Mere Husband Ki Biwi Trailer Out : बॉलिवुडचा स्टार अभिनेता अर्जुन कपूर सिंघम-3 चित्रपटामुळे चर्चेत आला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका बजावली होती. आता मात्र अर्जुन कपूरचा थेट नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लवकरच 'मेरे हजबंड की बिबी' हा चित्रपट येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा ट्र्रेलर लॉन्च झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असताना हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरला सिनेरसिकांकडून भरभरून प्रेमही मिळत आहे.
प्रेमाचा ट्रँगल नव्हे तर सर्कल दिसणार
या चित्रपटात अर्जुन कपूर हा मुख्य नायकाची भूमिका बजावत आहे. तर भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रीदेखील या चित्रपटात नायिकांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. आता या चित्रपटाचे सर्व काम झाले असून तो 21 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
अर्जुन कपूरचा हा हा रोमँटिक-कॉमेडी असलेला चित्रपट आहे. ट्रेलरच्या माध्यमातून या चित्रपटात काय कहाणी असेल हे सांगण्यात आले आहे. या चिजत्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेन्मेंटने केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी मुदस्सर अजीज यांनी पार पाडलेली आहे. अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह, भूमी पेडणेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर आपापाल्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट म्हणजे लव्ह ट्रँगल नव्हे तर लव्ह सर्कल आहे, असं कॅप्शनही त्यांनी दिलंय.
चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?
या चित्रपटात अर्जुन कपूर हा भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह या दोघींच्या प्रेमात फसल्याचं दिसत आहे. या ट्रेलरनुसार भूमी पेडणेकर ही अर्जुन कपूरची पत्नी असते. या दोघांचाही नंतर घटस्फोट होतो. त्यानंतर अर्जुन सिंह हा रकुल प्रीत सिंहच्या प्रेमात पडतो. मात्र मध्येच भूमी पेडणेकरला रेट्रोग्रेड अॅम्नेशिया हा आजार होतो. ज्यामुळे ती तिचा भूतकाळ विसरून जाते. त्यानंतर अर्जुन कपूरला मिळवण्यासाठी रकूल प्रीत सिंह आणि भूमी पेडणेकर यांच्यात स्पर्धा लागते. या स्पर्धेत मात्र अर्जुन कपूरची चांगलीच फरफट होते. अर्जुन कपूर नेमका कोणत्या अडचणीत सापडतो? तो कुणाशी विवाह करतो? हे प्रत्यक्ष चित्रपटातच समजेल.
मात्र चित्रपटात तुफान कॉमेडी पाहायला मिळणार आहे. येत्या 21 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अर्जुन कपूरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
Yami Gautam: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा ग्लॅमरस अंदाज; पाहा फोटो!
Udit Narayan: उदित नारायण यांनी महिलांना लाईव्ह KISS केलं; व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देत म्हणाले…
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
