एक्स्प्लोर
'माऊली' सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित
संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं असून त्यांनीच हे गाणं गायलं आहे. रितेश देशमुख, अभिनेत्री सैयामी खेर, संगीतकार व गायक अजय-अतुल यांच्यावरच हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखचा दुसरा मराठी चित्रपट 'माऊली'चं आज प्रदर्शित झालं आहे. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर 'माझी पंढरीची माय' हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.
संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं असून त्यांनीच हे गाणं गायलं आहे. रितेश देशमुख, अभिनेत्री सैयामी खेर, संगीतकार व गायक अजय-अतुल यांच्यावरच हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. काही दिवसांर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
'लय भारी' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता रितेश देशमुख ‘माऊली’ या चित्रपटातून पुन्हा भेटीला येत आहे. येत्या 21 डिसेंबर 2018 ला प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदार या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
विश्व
बीड
Advertisement