Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Animal: रणबीरच्या अॅनिमलमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्री साकारली भूमिका





Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! अभिनेता विवेक सांगळेसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली अंकिता वालावलकर


Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walwwalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अंकिताचं आता 'कसे विसरु' (Kase Visru) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता विवेक सांगळेसोबत (Vivek Sangle) स्क्रीन शेअर करताना अंकिता दिसली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई! सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी


Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे. आता या मालिकेत लगीनघाईला सुरुवात होणार आहे. सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस हजेरी लावणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Nana Patekar : 50 वर्षांच्या करिअरमध्ये एकाही दिग्दर्शकाने सिनेमासाठी विचारणा केली नाही; नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत


Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चर्चेत आहेत. नानांनी 8 डिसेंबर 2023 रोजी तिरुंवनंतपुरम येथील केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स्वात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या महोत्सवात नानांनी त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त केली.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रिन


Kartik Aaryan Movie : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत असतात. अशातच आता कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा