Salaar Part 1: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) सालार (Salaar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन सीन्स बघायला मिळाले आहेत. अशातच सालार (Salaar) या चित्रपटाला आता सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट मिळालं आहे.
सालारला मिळालं A सर्टिफिकेट
सालार चित्रपट रिलीज व्हायला आता दहा दिवस बाकी आहेत. हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनकडे (CBFC) सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या चित्रपटाचा रनटाइम हा 2 तास, 55 मिनिटे आहे.
'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट
प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या सालार हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन हा या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. पृथ्वीराजनं नुकतेच या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले. या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केल्यावर पृथ्वीराजनं सोशल मीडियावर स्टुडिओमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, सालार फायनल डबिंग करेक्शन केलं आहे. मी गेली अनेक वर्षे काम केलेल्या विविध भाषांमधील माझ्या सर्व पात्रांसाठी माझा स्वतःचा आवाज देण्याचा विशेषाधिकार मला मिळाला आहे. मी माझ्या काही पात्रांसाठी अनेक भाषांमध्ये डबिंगही केले आहे. पण एकाच व्यक्तिरेखेसाठी चित्रपटात 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग करणं ही गोष्ट मी पहिल्यांदाच केली आहे. तेलुगु, कन्नड, तामिळ, हिंदी आणि अर्थातच मल्याळम या भाषांमध्ये मी डबिंग केलं आहे. देवा आणि वरधा तुम्हाला 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये भेटतील!"
श्रुती हासन आणि जगपती बाबू हे देखील सालार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. विजय किरगंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सालार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: