Animal: रणबीरच्या अॅनिमलमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्री साकारली भूमिका
अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंदीप रेड्डी वांगा यांनी अॅनिमल चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
बॉबी देओल, रश्मिका मंदाना यांनी देखील अॅनिमल या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. काही मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.
अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेनं देखील अॅनिमल या चित्रपटात काम केलं आहे. तिनं या चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली आहे.
अॅनिमल या चित्रपटात मृण्मयीचा एकच सीन आहे, पण या सीनमध्ये पण मृण्मयीनं तिच्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील अॅनिमल या चित्रपटात काम केलं आहे.
अॅनिमल या चित्रपटामधील उपेंद्र लिमयेच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट होत आहे, तसेच उपेंद्रच्या एन्ट्रीवर प्रेक्षक शिट्ट्या देखील वाजवत आहेत. अॅनिमल या चित्रपटात उपेंद्रची भूमिका काही मिनिटांची आहे. पण त्या काही मिनिटांमध्ये उपेंद्र प्रेक्षकांची मनं जिंकतो.
अॅनिमल चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचं अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटाचा अॅनिमल पार्क हा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.