Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Panchak movie Trailer out : प्रतीक्षा संपली! माधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


Panchak movie Trailer out: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit) आणि डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांच्या पंचक (Panchak) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Mumbai : महिलांच्या डब्यात नाचणाऱ्या तरुणीसोबत होमगार्डही थिरकला, व्हिडीओ व्हायरल होताच गार्डवर मोठी कारवाई!


Mumbai : मुंबईकरांसाठी लोकल (Mumbai Local) ही खूपच खास आहे. लोकलच्या डब्यात भजन गाण्यापासून ते अगदी भाजी साफ करण्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी प्रवासी करत असतात. आजच्या तरुण पिढीला रील  बनवण्याचं खूप वेड आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलीने महिलांच्या डब्यात एक रील बनवलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं. या व्हिडीओमध्ये त्या तरुणीसोबत होमगार्डही थिरकताना दिसत आहे. वर्दीमध्ये डान्स करणं होमगार्डला महागात पडलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sukh Mhanje Nakki Kay Asta :  पुण्याची मृण्मयी गोंधळेकर साकारतीये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'राजमा' ही भूमिका; जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल...


Sukh Mhanje Nakki Kay Asta:  छोट्या पडद्यावरील  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Bhi Nakki Kay Asta)  या मालिकेचं नवं पर्व सुरु झालंय. मालिकेच्या कथानकामध्ये 25 वर्षांचा लीप आला असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतलाय. पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहेच त्यासोबतच मालिकेतली अनेक नवी पात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजमा ही बोलू शकत नाही. लहान असताना तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली. राजमाचा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. राजमा ही भूमिका मृण्मयी गोंधळेकरनं साकारली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Movie Shooting : छोटा पॅकेट बडा धमाका; गंभीर दुखापत होऊनही शूटिंगदरम्यान 'या' बालकलाकाराने केली कमाल


Khurchi Movie Shooting : 'खुर्ची' (Khurchi) हा बहुचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत होऊनही बालकलाकार आर्यन हगवणे (Aryan Hagawane) याने कमाल केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा