Sukh Mhanje Nakki Kay Asta:  छोट्या पडद्यावरील  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Bhi Nakki Kay Asta)  या मालिकेचं नवं पर्व सुरु झालंय. मालिकेच्या कथानकामध्ये 25 वर्षांचा लीप आला असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतलाय. पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहेच त्यासोबतच मालिकेतली अनेक नवी पात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजमा ही बोलू शकत नाही. लहान असताना तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली. राजमाचा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. राजमा ही भूमिका मृण्मयी गोंधळेकरनं साकारली आहे.


जाणून घ्या मृण्मयी गोंधळेकरबद्दल...


सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील राजमा ही भूमिका अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर साकारतेय. मृण्मयी मुळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. हीच आवड जोपासत तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. नृत्याची आवड आणि अभिनयाच्या वेडापायी तिने मुंबई गाठली. मृण्मयीने अनेक रिऍलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे आणि ती विजेतीही ठरली आहे. अनेक मालिकांमध्येही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिली मालिका आहे. इतक्या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अश्या शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली. राजमा बोलू शकत नाही. न बोलता भावना व्यक्त करणं आव्हानात्मक आहे. अश्या पद्धतीचं पात्र मृण्मयीने याआधी साकारलेलं नाही. त्यामुळे राजमा साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत असल्याचं मृण्मयी म्हणाली.






'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेची स्टार कास्ट


सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गिरीजा प्रभू (Girija Prabhu), मंदार जाधव (Mandar Jadhav) ,वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), माधवी निमकर (Madhavi Nimkar) हे कलाकार महत्वाची भूमिका साकारतात. मालिकेतील गौरी जयदीप शिंदे (Gauri Jaydeep Shinde) ही भूमिका गिरीजानं साकारली आहे, तर जयदीप सूर्यकांत शिंदे ही भूमिका मंदार जाधवनं साकारली आहे. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sukh Mhanje Nakki Kay Asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत 25 वर्षांच्या लीप; मालिकेत येणार रंजक वळण