Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Jhimma 2 : 'झिम्मा 2'ची वाटचाल 10 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन


Jhimma 2 Box Office Collection : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. आता हा सिनेमा लवकरच 10 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bigg Boss 17 : विकी जैनसाठी अंकिता लोखंडे इन्वेस्टमेंट; ईशा मालवीयचा खुलासा


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सहभागी झाल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. पण अंकिता आणि विकीच्या सततच्या भांडणामुळे प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


मराठमोळी अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव


अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नसराई सुरू आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा देखीर पार पडला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pooja Sawant : पूजा सावंतने अखेर तिच्या होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला!


मठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा