Pooja Sawant :पूजा सावंतने अखेर तिच्या होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला!
राठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण या फोटोंमध्ये तिने जोडीदाराचा चेहरा लपवला होता. त्यामुळे पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे.
सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. पूजाने शेअर केलेल्या पोस्टवर भाऊजी नमस्कार, लक्ष्मी नारायणाचा जोडा, अशा कमेंट्स करत अभिनेत्रीचं आणि सिद्देशचं अभिनंदन केलं आहे.
पूजा सावंतने तिचं रिलेशन कायम गुलदस्त्यात ठेवलं. इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्र-मंडळींना मात्र सिद्देशबद्दल माहिती होतं.
अभिनेत्रीने फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'अॅन्ड द डिज्नी फिल्म्स बिगिंस' अशी कमेंट त्याने केली होती.
त्यानंतर सिद्धार्थ डिज्नी कंपनीत कामाला असल्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे सिद्धार्थ ऑस्ट्रेलियात राहत असल्याचीदेखील चर्चा आहे.
पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी चाहते आता उत्सुक आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.