Animal First Day Advance Booking : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. त्यामुळे रणबीर शाहरुखचा (Shah Rukh Khan) रेकॉर्ड मोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


रणबीरच्या 'अॅनिमल'ची सध्या सर्वत्र चांगलीच क्रेझ आहे. ओपनिंग डेला हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल असं म्हटलं जात आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर, गाणी आणि पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 


'अॅनिमल'चा अॅडव्हान्स बुकिंग रिपोर्ट काय आहे? (Animal Advance Booking Report)


सॅकनिल्क एन्टटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' या सिनेमाचे देशभरात 7 लाख 45 हजार 992 तिकीट विकले गेले आहेत. 'अॅनिमल'चे हिंदीत 2डीमध्ये आतापर्यंत 10703 शोचे पाच लाख 75 हजार 197 तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्री झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने 17 कोटी 16 लाख 50 हजार 751 रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 


'अॅनिमल'च्या तेलुगू वर्जनने दोन कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'अॅनिमल'चे ओपनिंग डेचे 1503 शोपैकी 163361 तिकीट विकले गेले आहेत. तामिळमध्ये अॅनिमलचे 124 शोपैकी 5861 तिकीट विकले गेले आहेत. तामिळमध्ये अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 7 लाख 16 हजारपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर कन्नड वर्जनचे 1553 तिकीट विकले गेले असून 1 लाख 95 हजार रुपयांपेक्षा अधिक कमाई सिनेमाने केली आहे. एकंदरीतच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'अॅनिमल' या सिनेमाने 19.7 कोटींची कमाई केली आहे.






'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अॅनिमल (Animal Release Date)


'अॅनिमल' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 19 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर आणि सुरेश ओबेरॉय या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Animal : रणबीर-रश्मिकाच्या 'ॲनिमल' सिनेमावर सेन्सॉर बोर्डाची कात्री; इंटीमेट दृश्यांवर आक्षेप