Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सहभागी झाल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. पण अंकिता आणि विकीच्या सततच्या भांडणामुळे प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


'बिग बॉस 17'च्या घरात सतत अंकिता आणि विकीचं भांडण पाहायला मिळत आहे. दररोज वेगवेगळ्या विषयांवर ते भांडत आहेत. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता आणि विकीचे रोमँटिक मोंमेंट्स पाहायला मिळतील असं चाहत्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळचं आहे. दरम्यान मन्नारा चोप्रा आणि सना रईस खान यांना ईशा मालवीयने विकीने अंकितासोबत लग्न का केलं हे सांगितलं आहे.


अंकितासोबत लग्न करणं माझी इन्वेस्टमेंट : विकी जैन


ईशाने (Isha Malviya) काही दिवसांपूर्वी विकीला विचारलं होतं की,"नशिबावर तुझा विश्वास आहे का?". त्यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"नशिबावर माझा विश्वास नाही". अंकिता लोखंडेसोबत तुझं नातं काय आहे? अंकितासोबत लग्न करायचं हे तू लहानपणीचं ठरवलं होतं का?". त्यावर उत्तर देत विकी म्हणाला होता,"अंकितासोबत लग्न करणं ही माझी इन्वेस्टमेंट आहे".


ईशा पुढे म्हणाली,"विकीच्या या बोलण्यानंतर मला धक्का बसला होता. मुंबईत आल्यानंतर विकीचे काही मित्र झाले. त्याचे आणि अंकिताचे काही कॉमन मित्र होते. या मित्रांच्या माध्यमातून तो पहिल्यांदा अंकिताला भेटले होता. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले आणि लग्नबंधनात अडकले. अंकितासोबत संसार थाटण्यासाठी विकीने जाणूनबुजून तिच्या मित्रांसोबत मैत्री केली". त्यावर मन्नारा म्हणाली,"विकी भाई एका सेलिब्रिटी जोडीदाराच्या शोधात होता". 


ईशा म्हणते,"ओरीला इंप्रेस करण्याचा विकीने प्रयत्न केला. त्याचं व्यवस्थित नावदेखील त्याला घेता येत नव्हतं. पण तरीही त्याला इंप्रेस करण्याचे तो वेगवेगळे प्रयत्न करत होता. 'बिग बॉस 17' जिंकण्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. सुरक्षित राहण्यासाठी तो काहीही करू शकतो. प्रत्येक जण हा त्यासाठी इन्वेस्टमेंट आहे".


'बिग बॉस 17' या कार्यक्रमात दररोज नवनवे ट्विस्ट घडत आहेत. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन व्हावं साठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. आता या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये चर्चेत राहण्यासाठी अंकिता लोखंडेने केलं प्रेग्नंसीचं नाटक? जिग्ना वोराने सांगितलं सत्य