Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Diwali 2023 : 'आली दिवाळी आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी दिवाळी'; दिवाळीत 'ही' गाणी नक्की ऐका


Diwali 2023 : 'आली दिवाळी आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी दिवाळी' अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'दीपावलीचा सण वर्षाचा' हे गाणं माझा भाऊराया या अल्बममधील आहे. 'माझा भाऊराया परदेशाला' हे भाऊबीज स्पेशल गाणं आहे. लता मंगेशकरांनी गायलेलं 'आली दिवाळी' हे गाणं आजही आवडीने ऐकलं जातं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shreyas Talpade : श्रेयस तळपदेचा पहिला पॅन इंडिया सिनेमा 'अजाग्रत' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; माजी मुख्यमंत्र्याची पत्नी दिसणार मुख्य भूमिकेत


Shreyas Talpade : वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अजाग्रत' (Ajagratha) या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Nana Patekar : नाना पाटेकर चाहत्यावर भडकले; वाजवली सणसणीत कानाखाली; व्हिडीओ व्हायरल


Nana Patekar : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा आगामी सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता नाना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. नाना आता चाहत्यावर भडकले आहेत. चाहत्याच्या त्याने सणसणीत कानाखाली वाजवली आहे. नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा सिनेमातील सीन असल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Thipkyanchi Rangoli : प्रेमाच्या रंगांनी भरून पूर्ण होणार 'ठिपक्यांची रांगोळी'; 'या' दिवशी पार पडणार शेवटचा भाग


Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेमाच्या रंगानी भरून 'ठिपक्यांची रांगोळी' पूर्ण होणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो


Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी (Diwali 2023) दुबईत साजरी केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. सोनाली कुलकर्णीसाठी यंदाची दिवाळी खूप खास आहे. सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी दुबईत साजरी केली आहे. सोनालीने दुबईत नवं घर घेतलं असून या घरातच तिने यंदाची दिवाळी साजरी केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा