Tamannaah Bhatia Vijay Varma Serious About Marriage : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) सध्या चर्चेत आहेत. तमन्ना आणि विजयची जोडी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतेच एका दिवाळी पार्टीत तमन्ना आणि विजय एकत्र स्पॉट झाले आहेत. आता त्यांच्या लग्नासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.
तमन्ना भाटिया अन् विजय वर्मा लवकरच अडकणार लग्नबंधनात
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या डेटिंगच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आता त्यांच्या लग्नासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. तेलुगू वन न्यूजच्या रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय जोडीदार म्हणून एकमेकांचा विचार करत आहेत. आपल्या नात्याला नवं नाव देण्याचा ते विचार करत आहेत".
तमन्ना भाटियावर कुटुंबियांचा दबाव
मीडिया रिपोर्टनुसार, तमन्ना भाटियाचं वय 30 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात आहे. पण आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आनंदी झाले आहेत. तमन्ना आणि विजयचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. 'लस्ट स्टोरीज 2' या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सीरिजमधील त्यांच्या बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा रंगली.
एका मुलाखतीमध्ये तमन्नानं लस्ट स्टोरीज-2 चित्रपटातील विजयसोबतच्या इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत सांगितलं,"एखाद्या अभिनेत्यासोबत काम करताना मला इतके सुरक्षित कधीच वाटले नाही आणि ही गोष्ट एका अभिनेत्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला काम करताना अशा प्रकारची सुरक्षितता जाणवली पाहिजे, विशेषतः अशा चित्रपटात. त्याच्यामुळे मला इतके सुरक्षित वाटले की, त्या सीनमध्ये मी काही बोलण्यास, काहीही करण्यास, विशिष्ट प्रकारे भावना व्यक्त करण्यास घाबरले नाही. त्याने मला हे सर्व सोपे करुन दिले. त्यामुळे ही त्याची गोष्ट मला नक्कीच आवडणारी आहे".
संबंधित बातम्या