Children's Day Special Marathi Serials Child Artist : मराठी मालिका (Marathi Serials) या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सिनेमे, वेबसीरिज, ओटीटी अशी अनेक माध्यमे असली तरी मालिका पाहणारा एक वेगळा चाहतावर्ग आहे. मालिकांत काम करणाऱ्या कलाकारांसह बालकलाकारदेखील (Children's Day 2023) भाव खाऊन जात असतात. आज बालदिनानिमित्त जाणून घ्या या बालकलाकारांबद्दल...


मायरा वैकुळ (Myra Vaikul) : बालकलाकार मायरा वैकुळचा मोठा चाहतावर्ग आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. मराठी मालिकेत आपल्या अभिनयाची झलक दाखवल्यानंतर मायराने 'नीरजा' या हिंदी मालिकेतही काम केलं आहे.


साईशा भोईर (Saisha Bhoir) : सोशल मीडिया स्टार आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकारांच्या यादीत साईशा भोईरचं नाव घेतलं जातं. साईशा सध्या 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत चिंगीचे पात्र साकारत आहे. यामालिकेआधी ती 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिसली होती.


अवनी जोशी (Avani Joshi) : अवनी जोशी ही बालकलाकार असण्यासोबत गायिकादेखील आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तिने पिहू ही भूमिका साकारली आहे. 


साईशा साळवी (Saisha Salvi) : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत साईशा साळवी जयदीप-गौरीच्या मुलीची अर्थात लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. 


आदिरा औंधकर (Adira Aundhkar) : 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून बालकलाकार आदिरा औंधकर घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत तिने अभ्या आणि लतिकाच्या लेकीची भूमिका साकारली होती. 


राजवीरसिंह गायकवाड (Rajveer Singh Gaikwad) : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून राजवीर सिंह गायकवाड घराघरांत पोहोचला आहे. या मालिकेत त्याने साकारलेली लाडूची भूमिका चांगलीच गाजली. लाडूच्या भूमिकेच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


हर्षद नायबळ (Harshad Naybal) : 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून हर्षद नायबळ घराघरांत पोहोचला. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि त्याची जोडी चांगलीच गाजली. या कार्यक्रमाने मॉनिटर अशी नवी ओळख त्याला मिळाली. या कार्यक्रमानंतर त्याने पिंकीचा विजय असो या मालिकेत दिप्याची भूमिका साकारली. 


संबंधित बातम्या


Childrens Day Special : व्यावसायिक नाटकांना मिळणारा मान सन्मान बालनाट्याच्या वाटेला येत नाही; बालदिनी बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार यांची खंत