Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Gautami Patil and Madhuri Pawar : गौतमी पाटील Vs माधुरी पवार... कोण आहे लयभारी?


Gautami Patil And Madhuri Pawar Dance Show : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) आज घराघरांत लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ, राडा होत असला तरी चाहते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत असतात. गौतमीमुळे नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवारचा (Madhuri Pawar) खेळ खल्लास झाल्याचं म्हटलं जात आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sukanya Mone : "जास्त दारू प्यायली का?" सुकन्या मोनेंच्या 'त्या' व्हिडीओवर महिलेची कमेंट; सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाल्या,"नशा आहे ही..."


Sukanya Mone : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सुकन्या मोने (Sukanya Mone) हे नाव आदराने घेतलं जातं. नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही दिवसांपू्र्वी त्यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री नशा केली असल्याची कमेंट एका महिलेने केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' रोमांचक वळणावर; अर्जुन अर्पणाला भेटणार का?


Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. अर्जुन अप्पीजवळ पोहोचू शकेल का? अर्जुन आणि अप्पीची भेट होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ketaki Chitale : "सामान्य माणसं काय कोणत्या पदालाही सोडणार नाहीत"; ॲट्रॉसिटी कायद्यावर केतकी चितळेची खास पोस्ट


Ketaki Chitale On Atrocities Act : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते.  आता अॅट्रॉसिटी कायद्यावर अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट; रत्नमाला मोहितेचा भूतकाळ येणार समोर!


Bhagya Dile Tu Mala Marathi Serial Update : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता समोर येणार आहे.  रत्नमालाचा नवा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा