Ram Charan Meets Mahendra Singh Dhoni : क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनाही धोनी आवडतो. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) धोनीची भेट घेतली आहे. तसेच धोनीसोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


राम चरण महेंद्र सिंह धोनीच्या भेटीला (Ram Charan Shared Photo With Mahendra Singh Dhoni)


राम चरण आणि महेंद्र सिंह धोनी या दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. राम चरणही महेंद्र सिंह धोनीचा मोठा चाहता आहे. आता अभिनेत्याने धोनीची भेट घेतली असून त्याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"भारताच्या शानला भेटून खूप आनंद झाला".






राम चरणने शेअर केलेल्या फोटोमधील महेंद्र सिंह धोनीचा शानदार लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. बेज रंगाची पॅन्ट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट असा धोनीचा लूक होता. तर राम चरणने हिरव्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं. 


चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव


राम चरणने धोनीसोबत शेअर केलेला फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. धोनी सर सम्मान बॉटन, RC-MCD म्युचुअल्स के लिए सपना, अण्णा तू देखील भारताची शान आहेस, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 
राम चरण 4 ऑक्टोबर 2022 रोजी सिद्धिविनायक मंदिरात स्पॉट झाला होता. अभिनेता आणि बाप्पाचं खास नातं आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.


राम चरण 'गेम चेंजर' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 


'आरआरआर' (RRR) या सिनेमानंतर राम चरण आता शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' (Game Changer) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणीदेखील स्क्रीन शेअर करताना दिसेल. 'गेम चेंजर' हा सिनेमा तेलुगू, तामिळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात राम चरण आणि कियारा आडवाणीसह सूर्या, जयराम, अंजली आणि श्रीकांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.


संबंधित बातम्या


Ram Charan : राम चरण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा फोटो