Bhagya Dile Tu Mala Marathi Serial Update : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता समोर येणार आहे.  रत्नमालाचा नवा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


'भाग्य दिले तू मला' या मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली आहे. आजवर आलेल्या अनेक संकटांमध्ये त्यांना रत्नमालाची साथ मिळाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहचली आहे की माणूस कोण असेल आणि त्यांचा ह्या परिवाराशी काय संबंध असेल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आले पण हा व्यक्ती दुसरा तीसरा कोणी नसून रत्नमालाचा नवरा अनिरुद्ध आहे आणि याचमुळे आता मालिकेला एक वेगळा वळण मिळणार आहे.


रत्नमाला मोहितेचा भूतकाळ येणार प्रेक्षकांसमोर
 
अनेक वर्षांनी अचानक मेलेला नवरा समोर आला? तो जिवंत कसा? जिवंत होता तर इतकी वर्ष कुठे होता? घरी का नसेल आला? असे अनेक प्रश्न रत्नमालाबरोबरच प्रेक्षकांना पडणार आहेत. 
त्यामुळे रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.


निवेदिता सराफ म्हणजेच रत्नमाला मालिकेत येणाऱ्या नवीन वळणाबद्दल म्हणाल्या,"प्रेक्षकांनी आतापर्यंत आमच्या मालिकेला भरभरून आम्हाला तुम्ही प्रतिसाद दिलात. आता आमची मालिका एक नवीन वळण घेते आहे. आता रत्नमालाच्या पूर्वायुष्यातला एक खूप मोठं रहस्य लोकांसमोर येणार आहे आणि ते रहस्य म्हणजे रत्नमालाचे पती जिवंत आहेत असं लवकरच प्रेक्षकांना आणि रत्नमलालाही कळणार आहे. त्यांचं नाव आहे अनिरुद्ध. 


निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या,"अनिरुद्ध कुठे होते? काय झालं? रत्नमालाला का भेटले नाही इतक्या वर्षात?, आताच का समोर आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ही मालिका बघता बघता मिळणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमचं खूप मनोरंजन होणार आहे. हे मलिकेतलं नवं वळण नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे". 


'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवं वळण


'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवं वळण आलं आहे. रत्नमालाला ऑफिसमध्ये मंगळसूत्र मिळतं. त्यानंतर तिला अनिरुद्धने दिलेल्या मंगळसूत्रची आठवण होते. तेव्हा झालेले संभाषण तिला आठवते. अनिरुद्धने रत्नमाला आधी त्यांच्या गावी गुहागारला राहात असताना अनिरुद्धने रत्नमालाला मंगळसूत्र दिले होते. त्या काळच्या गोष्टी तिला आठवतात. रत्नमाला आधीपासूनच तत्वांना धरून चालणारी आहे. त्या काळी सुध्दा जेव्हा अनिरुद्ध व तिचे मतभेद व्हायचे तेव्हा ही ती तिच्या मतांवर ठाम असायची. आणि अनिरुद्धचे मतभेद व्हायचे तेव्हा. तिच्या नवऱ्याला तिचे हे तत्व पटत नव्हते.


संबंधित बातम्या


Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' मालिकेत राज-कावेरी अडकणार लग्नबंधनात, पाहा फोटो