Sukanya Mone : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सुकन्या मोने (Sukanya Mone) हे नाव आदराने घेतलं जातं. नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही दिवसांपू्र्वी त्यांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री नशा केली असल्याची कमेंट एका महिलेने केली आहे. 

'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. हा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरलाय. दरम्यान या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलाय. या सक्सेस पार्टीमध्ये सुकन्या मोने यांनी भन्नाट डान्स केला. एकीकडे चाहत्यांनी त्यांच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं तर दुसरीकडे मात्र एका महिलेने त्यांना ट्रोल केलं. 

जास्त दारू प्यायली का? महिलेच्या कमेंटवर सुकन्या मोनेंचं सडेतोड उत्तर

सुकन्या मोनेंच्या व्हायरल व्हिडीओवर एका महिलेने कमेंट केली आहे,"She is Over Drunk" म्हणजेच जास्त दारू प्यायली का?". संबंधित महिलेला कमेंट करत सुकन्या मोनेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"संगीताशी नशा, यशाची नशा आहे ही...बाकी काही नाही". सुकन्या मोनेंचं हे सडेतोड उत्तर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 

सुकन्या मोनेंचा 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता त्यांनी आणखी एका सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. सुकन्या मोने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. 'बाईपण भारी देवा'नंतर त्यांचा 'इंद्रधनुष्य' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुकन्या मोनेंचा प्रवास...

सुकन्या मोने यांच्या 'कुसुम मनोहर लेले','चारचौघी' ,'आभाळमाया','जुळून येती रेशीमगाठी','दुर्गा झाली गौरी' अशा अनेक कलाकृती चांगल्याच गाजल्या आहेत. प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संंबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...