Gautami Patil And Madhuri Pawar Dance Show : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) आज घराघरांत लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ, राडा होत असला तरी चाहते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत असतात. गौतमीमुळे नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवारचा (Madhuri Pawar) खेळ खल्लास झाल्याचं म्हटलं जात आहे.
गौतमी पाटील आणि माधुरी पवार हा वाद त्या दोघींपुरताच मर्यादीत नाही. सोशल मीडियावर दोघींचाही चाहतावर्ग असून त्यांच्यामध्येही शाब्दीक युद्ध रंगतं. गौतमी आणि माधुरीने आपल्या नृत्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दोघींच्याही अदा एकमेकींशिवाय भिन्न आहेत. त्यांची नृत्य सादर करण्याची पद्धत वेगळी आहे. पण तरीदेखील गौतमीच्याच डीजे शोला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो.
कोण आहे माधुरी पवार? (Who is Madhuri Pawar)
माधुरी पवार आज एक अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून घराघरांत पोहोचली आहे. पण तरीही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. माधुरीचं बालपण साताऱ्यात गेलं असून तिचे वडील बांधकाम करत असल्याने ती आजीकडे राहायची. आजीच्या पत्र्याच्या झोपडीत राहत असताना तिने शिक्षण पूर्ण केलं. या प्रवासात अभिनयाची आणि नृत्याची आवड मात्र जोपासली.
माधुरीचा जन्म साताऱ्यातील एका छोट्या खेड्यात सामान्य कुटुंबात झाला आहे. अभिनयाची आणि नृत्याची आवड जोपासत असताना करिअर म्हणून तिने याच गोष्टींचा विचार केला आणि मुंबई गाठली. 'महाराष्ट्राची लोककला' या कार्यक्रमाने तिला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने करिअरला सुरुवात केली. पुढे 'अप्सरा आली' या कार्यक्रमातही ती सहभागी झाली. 'तुझ्यात जीव रंगला,'देवमाणूस', 'मिसेस मुख्यमंत्री' अशा अनेक लोकप्रिय मालिकांचा ती भाग आहे.
माधुरीने लावणीच्या ठेक्यावर महाराष्ट्राला वेड लावलं. तिच्या 'मला जाऊद्याना घरी', 'नाद खुळा', 'बैलगाड्या शर्यत', 'बघतोय शिक्षावाला', 'बाई मी लाडाची गं लाडाची' अशा अनेक लावण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा आदर करायला हवा. पण गौतमी पाटीलमुळे माधुरीचा खेळ खल्लास झाला आणि तिने गौतमीवर टिका करायला सुरुवात केली. एका मुलाखतीत गौतमीचं नाव न घेता ती म्हणाली होती,"कलाकाराने कलेचा आदर करायला हवा. लावणीचा मोठा दर्जा आहे. प्रेक्षकांची करणूक करायला हवीच. पण अशाप्रकरचे हातवारे केल्याने त्यांची करमणूक होत नाही. अशा गोष्टी थांबवण्याची प्रेक्षकांची जबाबदारी असून त्यावर बंदी घालण्यात यावी".
संबंधित बातम्या