Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Gautami Patil : गौतमी पाटीलला सिंधुदुर्गात नो एन्ट्री; नेमकं प्रकरण काय?


Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गातही (Sindhudurg) गौतमीला नो एन्ट्री आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sonu Nigam : सोनू निगम वडापाव खातोय की गातोय? लवकरच नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रसाद ओकची रुचकर पाककृती


Sonu Nigam Song Prasad Oak Vadapav Movie : प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित 'वडापाव' (Vadapav) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam)  या सिनेमातील गाणं गाणार आहे. सोनूचा 'वडापाव' खातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसला जायचा विचार करताय? जाणून घ्या भाडं, नियम आणि अटींबद्दल...


Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं स्वप्न साकार झालं आहे. तिने कर्जतमध्ये फार्महाऊस (Prajakta Mali Karjat Farmhouse) घेतलं आहे. पण अभिनेत्रीच्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवण्यासाठी पर्यटकांना विशेष भाडं आणि काही नियम व अटीदेखील आहेत.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sur Nava Dhyas Nava : 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' होणार सुरू; जुनी गाणी नव्या रुपात सजणार


Sur Nava Dhyas Nava : संगीताचं खरं सौंदर्य म्हणजे ते कुठलीही मर्यादा न जुमानता लोकांना जोडतं. संगीत (Sur Nava Dhyas Nava) न आवडणारा व्यक्ती या जगात शोधून देखील सापडणार नाही. संगीत प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणत, उभारी आणत... संगीत म्हणजे ध्यास, निखळ आनंद. कोणत्याही कलेला आपण एखाद्या साच्यात बंदिस्त करून ठेऊ शकत नाही. अगदी तसंच गाण्याचं देखील आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Dada Kondke : 'वाजवू का','तुमचं आमचं जमलं' ते 'मुका घ्या मुका'; दादा कोंडकेंचे ब्लॉकबस्टर सिनेमे पुन्हा एकदा घरबसल्या पाहा


Dada Kondke Movies : विनोदाचा सम्राट दादा कोंडके (Dada Kondke) यांनी मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीही गाजवली. दादा कोंडकेंच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आता दादांचे ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांना पुन्हा एकदा घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. यात 'वाजवू का' (Vajau Ka), 'तुमचं आमचं जमलं' (Tumcha Aamcha Jamla) आणि 'मुका घ्या मुका' (Muka Ghya Muka) या सिनेमांचा समावेश आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा